धक्कादायक! ऑफिसमध्ये घुसून पत्नीवर पतीने केले सपासप वार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 21:33 IST2019-01-29T21:32:25+5:302019-01-29T21:33:56+5:30

आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पत्नीची हत्या करुन पतीने स्वत: भाईंदर पोलीस ठाण्यात हजर होऊन हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

Shocking In the office, the husband got married to the husband | धक्कादायक! ऑफिसमध्ये घुसून पत्नीवर पतीने केले सपासप वार 

धक्कादायक! ऑफिसमध्ये घुसून पत्नीवर पतीने केले सपासप वार 

ठळक मुद्देभाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावात राहणारा कुमार भोईर (३०) याचा गावातील वीणा म्हात्रे (३५) या तरुणीसोबत काही वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता.रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वीणाला लगतच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सखोल चौकशी करुनच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

भाईंदर - भाईंदर येथे पतीने आपल्या बेपत्ता पत्नीला तिच्याच कार्यालयात गाठून सपासप वार करून हत्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. पत्नीची हत्या करुन पतीने स्वत: भाईंदर पोलीस ठाण्यात हजर होऊन हत्येची कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. 

भाईंदर पश्चिमेकडील मुर्धा गावात राहणारा कुमार भोईर (३०) याचा गावातील वीणा म्हात्रे (३५) या तरुणीसोबत काही वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. वीणा गावातीलच राहणारी असल्याने तीचे माहेरी सतत येणे-जाणे होते. ती भाईंदर येथीलच व्यंकटेश्वरा इमारतीत एका चार्टर्ड अकाऊंटन्टकडे नोकरीला होती. दरम्यान तिचे गावातीलच एका तरुणासोबत सुत जूळले. त्याची कुणकूण पतीला लागू न देता ती १ महिन्यापूर्वी त्या तरुणासोबत अचानक बेपत्ता झाल्याचे गावातील सुत्रांकडून सांगण्यात आले. त्याची माहिती कुमारला झाल्याने तो संतापला होता. दरम्यान कुमारने याप्रकरणी भाईंदर पोलिसांत वीणा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिस तीचा शोध घेत असतानाच ती भाईंदर येथील कार्यालयात मंगळवारी आल्याची माहिती कुमारला मिळाली. त्याने तीला कार्यालयातच गाठून सोबत आणलेल्या चाकूने तीच्यावर सुमारे १६ ते १७ वार केले. यानंतर कुमारने स्वत: भाईंदर पोलिस ठाण्यात हजर राहून पत्नीच्या हत्येची कबुली दिल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वीणाला लगतच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे तिला मृत घोषित करण्यात आले. याप्रकरणी सखोल चौकशी करुनच पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Shocking In the office, the husband got married to the husband