धक्कादायक! पत्नीची गळा दाबून हत्या केली, जेवण बनवलं, मुलांना ट्युशनला पाठवलं, पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 13:14 IST2024-03-08T13:07:42+5:302024-03-08T13:14:50+5:30
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दररोजच्या वादाला कंटाळून रात्री उशीरा पत्नीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर सकाळी घरी जेवण बनवलं, मुलांना ट्युशनसाठी पाठवलं आणि यानंतर हत्येची माहिती पोलिसांना स्वत: दिली.

धक्कादायक! पत्नीची गळा दाबून हत्या केली, जेवण बनवलं, मुलांना ट्युशनला पाठवलं, पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली
पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दररोजच्या वादाला कंटाळून रात्री उशीरा पत्नीचा गळा दाबून हत्या केली. यानंतर सकाळी घरी जेवण बनवलं, मुलांना ट्युशनसाठी पाठवलं आणि यानंतर हत्येची माहिती पोलिसांना स्वत: दिली. ही घटना पश्चिम बंगालमधील बेहाला येथील आहे, पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत.
ब्रह्माकुमारी आश्रमात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ; नातेवाईकांकडून हत्येचा आरोप
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हत्ये केलेल्या आरोपीचे नाव कार्तिक दासने त्याचे वय ४१ असून पत्नीचे नाव समृद्धी आहे पत्नीचे वय २८ होते. गुरुवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीचा गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह झाकून ठेवला, यानंतर पतीने घरातील कामे उरकली आणि सकाळी लवकर उठून मुलांसाठी जेवण बनवलं.
मुलांना ट्युशनला पाठवल्यानंतर आरोपीने सकाळी साडेनऊच्या सुमारास पोलिसांना हत्येची माहिती दिली. आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे, पोलिस दासच्या दारात पोहोचेपर्यंत त्याने मुलांचे सामान बांधले होते आणि सासूला त्यांना वर्गातून परत आणायला सांगितले होते.
पोलिस जेव्हा घरी पोहोचले तेव्हा तो मृतदेहाजवळ शांतपणे बसला होता. आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याचा संशय दासला होता आणि या कारणावरून दोघांमध्ये वाद होत असल्याचे माहिती समोर आली आहे. बुधवारी रात्रीही असाच प्रकार घडला आणि रागाच्या भरात दासने तिची गळा आवळून हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पत्नीवर हल्ला करण्यापूर्वी आरोपीने मुलांना इतर कुठे पाठवले होते का, याचाही आम्ही तपास करत आहोत. पोलिसांना बोलवण्यापूर्वी त्याने रात्री पुरावे नष्ट केले की नाही याचा तपास सुरू आहे.