धक्कादायक! मुंब्र्यात नवविवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 22:10 IST2019-11-07T22:06:13+5:302019-11-07T22:10:19+5:30
पोलीस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक! मुंब्र्यात नवविवाहितेची आत्महत्या
मुंब्रा - अवघ्या एक महिन्यापूर्वी विवाह झालेल्या महेक शेख या नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. ती मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळील बाजारपेठेतील एका इमारतीमध्ये राहत होती. तिचा विवाह ज्याच्याबरोबर झाला होता. त्या जुबेर सय्यद याचा आधीही विवाह झाला होता.
ही बाब तिचे लग्न झाल्यानंतर उघकीस आल्याची माहिती तिच्या वडीलांनी दिली. आधीच्या लग्नाची माहिती त्याने लपवून ठेवल्यामुळे नवविवाहित दाम्पत्यामध्ये वारंवार खटके उडत होते.यातूनच तिने आत्महत्या केली असल्याची शक्यता वडिलांना व्यक्त केली.
या प्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलिसांनी सत्य उघडकीस आणावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याबाबत आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.