धक्कादायक! 'बायल्या' म्हणून चिडवल्यानं नंदुरबारच्या तरुणाची चेन्नईत आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 17:32 IST2019-07-10T17:28:56+5:302019-07-10T17:32:06+5:30
तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली

धक्कादायक! 'बायल्या' म्हणून चिडवल्यानं नंदुरबारच्या तरुणाची चेन्नईत आत्महत्या
नवी दिल्ली - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्याचा रहिवासी असलेल्या एका तरुणाने चेन्नईमध्येआत्महत्या केली आहे. २० वर्षीय तरुणाला मुलीसारख्या वागण्यामुळे चिडवलं जात होतं. या नेहमीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली आहे. तरुणाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्याने आत्महत्या करण्यामागील कारण देखील स्पष्टपणे लिहिलं आहे.
सापडलेल्या सुसाईट नोटमध्ये तरुणाने माझे शरीर पुरुषासारखे असून मी मुलींसारखा वागतो हे नमूद केलं आहे. मला गे म्हणून हिणवलं जात असून मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा बराच प्रयत्न केला. माझा ते लोकं तिरस्कार करतात. मला हिजडा, बायल्या म्हणून माझ्यामागून म्हणायचे. मी महिलेसारखा वागत होतो, याबद्दल मला खेद वाटत आहे असं तरुणाने सुसाईट नोटमध्ये स्पष्ट केले आहे. याबाबतचे वृत्त मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमानपत्राने दिले आहे. आत्महत्या केलेला अत्यंत गरीब घरातला आहे.