Shocking! The murder of a young man out of enmity; Incidents in Pune | धक्कादायक! पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून; पुण्यातील घटना

धक्कादायक! पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून; पुण्यातील घटना

ठळक मुद्देनांदेड फाट्याजवळ किर्ती हॉटेल समोर आरोपींची पान टपरी आहे. टपरीच्या उधारीवरून मृत अजय आणि आरोपींमध्ये भांडण असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याचे पोलीसांनी सांगितले.

पुणे : पूर्ववैमनस्यातून सिंहगड रस्त्यावर नांदेड फाटा येथे पाच जणांनी हल्ला कोयता, लोखंडी रॉड यांनी केलेल्या हल्ल्यात तरुणाचा खून झाला आहे. 
अजय शिवाजी शिंदे( वय २६, रा. जाधव नगर,गोसावी वस्ती नांदेड, ता. हवेली)  असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. 
 

गुरूवारी रात्री नऊच्या दरम्यान  भररस्त्यावर मोठ्या प्रमाणात  वाहनांची ये- जा चालू असताना  सदर घटना घडली असून महिन्यातील दुसऱ्या घटनेमुळे नांदेड परीसरात दहशदीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृताचा मावसभाऊ राकेश तुलशीराम जाधव यांनी फिर्याद दिली आहे. राहुल सपकाळ, रोहीत सपकाळ, दुर्गेश उर्फ दुर्ग्या, सुधीर उर्फ  सुध्या, पृथ्वी उर्फ चिराग( सर्व राहणार नांदेड ता.हवेली) अशी आरोपींची नावे असून सर्व फरार आहेत.  
 

नांदेड फाट्याजवळ किर्ती हॉटेल समोर आरोपींची पान टपरी आहे. टपरीच्या उधारीवरून मृत अजय आणि आरोपींमध्ये भांडण असल्याचे प्राथमिक तपासातून निष्पन्न झाल्याचे पोलीसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच  हवेली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सदाशीव शेलार, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम, पोलीस हवालदार संजय शेंडगे, पोलीस नाईक दिनेश  कोळेकर, पोलीस कर्मचारी संतोष भापकर,  राजेंद्र मुंडे,महेंद्र चौधरी, पोलीस मित्र सुदीप पोळ होमगार्ड सह घटनास्थळी दाखल झाले. हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या सूचना दिल्या. हवेली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार करत आहेत.

 

Web Title: Shocking! The murder of a young man out of enmity; Incidents in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.