शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! दगड, कोयत्याने पत्नीचा खून; मामुर्डी येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 16:20 IST

भांडणामुळे आठ दिवसांपासून पतीपत्नी राहात होते वेगळे 

ठळक मुद्देघटनेनंतर संबंधित महिलेचा पती गेला पळून

किवळे : गेल्या आठ दिवसांपासून भांडणामुळे वेगळे राहत असलेल्या पत्नीला तिच्या पतीने कोयता व दगडाने मारून जखमी केले. यात गंभीर जखमी झाल्याने तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मामुर्डी येथे रविवारी (दि. ५) सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संबंधित महिलेचा पती पळून गेला.अबिदा बेगम (वय ४०, रा. मामुर्डी, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर करीमशा अहमद शेख (वय ४५) असे फरार झालेल्या पतीचे नाव आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात शेख पतीपत्नीची भांडणे झाली होती. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून ते दोघे वेगळे राहत होते. त्यांचा मुलगा त्याच्या आईसोबत राहत होता. अबिदा व त्यांचा मुलगा आयन हे दोघे रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास मामुर्डी येथील एका बांधकाम कंपनीजवळ आले असता त्यांचा पती करीमशा शेख तेथे आला. त्यावेळी त्याने पत्नी अबिदा यांच्याशी भांडण केले. शेख याने अबिदा यांना कोयता व दगडाने जबर दुखापत केली. यात अबिदा गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर करीमशा तेथून पळून गेला. मुलगा आयन याने व तेथे जवळच काम करणाºया काही नागरिकांनी जखमी अबिदा यांना देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र अबिदा यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलगा आयन याच्या फियार्दीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होते. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना करण्यात आली आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडWomenमहिलाDeathमृत्यूPoliceपोलिस