धक्कादायक! प्रॉपर्टीसाठी धारदार शस्त्राने वार करुन मुलाने जन्मदात्या पित्यालाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2020 14:14 IST2020-06-18T14:11:38+5:302020-06-18T14:14:36+5:30

आरोपी आणि त्याचे वडील यांच्यात प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून नेहमी भांडण होत असे.

Shocking! Murder by a sharp weapon of old father for property | धक्कादायक! प्रॉपर्टीसाठी धारदार शस्त्राने वार करुन मुलाने जन्मदात्या पित्यालाच संपवलं

धक्कादायक! प्रॉपर्टीसाठी धारदार शस्त्राने वार करुन मुलाने जन्मदात्या पित्यालाच संपवलं

पिंपरी : प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून वडिलांना दोरीने बांधून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने वृद्ध वडिलांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली. दापोडी येथे मंगळवारी (दि. १६) ही घटना घडली.

सुनील मुतय्या पोलकम (वय ६८, रा. भाटीया चाळ, दापोडी) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा राजेश सुनील पोलकम (वय ३८, रा. इंद्रायणीनगर, दापोडी) असे अटक केलेल्या मुलाचे नाव आहे. योगेश रमेश येवले (वय ३५, रा. सुंदरबाग कॉलनी, दापोडी) यांनी बुधवारी (दि. १७) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजेश आणि त्याचे वडील सुनील यांच्यात नेहमी प्रॉपटी व पैशाच्या कारणावरून भांडण होत असे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारासही त्यांच्यात भांडण झाल्याने आरोपी राजेश याने त्यांच्या वडिलांना दोरीने बांधले. त्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुनील यांचा मृत्यू झाला. सहायक निरीक्षक गजानन बनसोडे तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! Murder by a sharp weapon of old father for property