धक्कादायक घटना; तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय मुलीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 01:41 IST2023-04-05T01:40:45+5:302023-04-05T01:41:03+5:30
खून झालेल्या मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वीच दिली होती.

धक्कादायक घटना; तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय मुलीचा खून
पिंपरी : तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १७ वर्षीय मुलीचा मृतदेह मंगळवारी (दि.४) चिखली घरकूल परिसरातील एका बंद इमारीतमध्ये आढळून आला. मुलीचा मृतदेह कुजलेला होता. तसेच तिच्या शरीरावर वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. खून झालेल्या मुलीच्या आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात तीन दिवसांपूर्वीच दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलीस मुलीचा शोध घेत होते. त्यांना शोध घेताना चिखलीमधील घरकुल परिसरातील पडक्या इमारतीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. मुलीच्या अंगावर हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळून आल्या. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.