धक्कादायक! नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 15:01 IST2019-09-12T14:59:53+5:302019-09-12T15:01:45+5:30
घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

धक्कादायक! नगर पालिका कर्मचाऱ्याची आत्महत्या
खामगाव - स्थानिक नगर पालिकेतील एका कर्मचाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. योगेश चव्हाण (३६) मृतक कर्मचाऱ्याचे नाव असून ते पालिकेतील भूमी विभागात कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होते. मात्र,गत साडेतीन महिन्यापासून ते आपल्या कर्तव्यावर अनुपस्थित होते. पालिकेतील अनुपस्थितीच्या काळात ते खासगी क्लीनिक चालवित असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, गेल्या एक दोन दिवसांपूर्वी त्यानी दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला असावा, अशी शक्यता पोलीस व्यक्त करीत आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे समजू शकले नाही. या घटनेमुळे पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.