धक्कादायक! पतीच्या विवाहबाह्य संबधामुळे चिमुकल्या मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 14:57 IST2019-02-13T14:56:04+5:302019-02-13T14:57:06+5:30
अनुजा वंजारी (३०) असं या महिलेचं नाव असून नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आलं आहे. याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धक्कादायक! पतीच्या विवाहबाह्य संबधामुळे चिमुकल्या मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या
मुंबई - कुर्ला परिसरात एका महिलेने मुलाची हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुजा वंजारी (३०) असं या महिलेचं नाव असून नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आलं आहे. याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिपकवर संतापलेल्या अनुजाने आपल्या ३ वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला देखील संपवून घेतले. एका लग्नसमारंभात अनुजाचे दीपकसोबत भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं. कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील गुरुदत्त सोसायटीत अनुजा तिच्या कुटुंबासोबत राहायची. मंगळवारी रोजच्या दिनक्रमानुसार अनुजाचा सासू आणि नवरा कामासाठी घराबाहेर पडले. मनात नवऱ्याविरुद्धचा भांडणामुळे निर्माण झालेला राग असल्याने अनुजाने ओढणीने आपल्या मुलाचा गळा घोटून आपल्या ३ वर्षीय मुलाची हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी कामावरुन परतलेल्या अनुजाच्या सासूने अनुजा बराचवेळ दार उघडत नसल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर शेजारील एक तरुण घराच्या खिडकीमधून आत घुसला. त्यावेळी घरात नेमकं काय झालंय याचा उलगडा झाला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा आणि अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सहाय्य्क पोलीस आयुक्त उत्तम कोलेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.