धक्कादायक...अल्पवयीन बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2018 14:32 IST2018-09-17T14:32:06+5:302018-09-17T14:32:43+5:30
या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सवू सखाराम उंबरसाडा (वय 16) आणि साधना वीनू उंबरसाडा (वय 17) या दोघी चुलत बहिणी आंबेसरी बारीपाडा येथील राहणाऱ्या आहेत.

धक्कादायक...अल्पवयीन बहिणींनी गळफास घेऊन केली आत्महत्या
डहाणू - डहाणू तालुक्यातील आंबेसरी येथे दोन अल्पवयीन बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे. सवू सखाराम उंबरसाडा (वय 16) आणि साधना वीनू उंबरसाडा (वय 17) या दोघी चुलत बहिणी आंबेसरी बारीपाडा येथील राहणाऱ्या आहेत. या चुलत बहिणींनी जवळच असलेल्या पारोळ जंगलातील उंबराच्या झाडाला गळफास घेउन केली आत्महत्या केली. दोघींचे मृतदेह डहाणू पोलिसांनी जंगलातून ताब्यात घेतले असून आत्महत्येचे कारण मात्र अजून समजले नाही.