गेम खेळण्यास लहान भावालाच मिळत होता मोबाइल, 10वीतील बहिणीने उचललं धक्कादायक पाउल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 09:44 IST2023-06-01T09:44:15+5:302023-06-01T09:44:29+5:30

Crime News : हरयाणाच्या फरीदाबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका दहावीत शिकत असलेल्या मुलीने आपल्या भावाची हत्या केली.

Shocking! Minor sister killed brother for mobile game in Faridabad | गेम खेळण्यास लहान भावालाच मिळत होता मोबाइल, 10वीतील बहिणीने उचललं धक्कादायक पाउल

गेम खेळण्यास लहान भावालाच मिळत होता मोबाइल, 10वीतील बहिणीने उचललं धक्कादायक पाउल

Sister Killed Brother: मोबाइलचं व्यसन आजकाल मोठ्यांसोबतच लहान मुलांमध्येही खूप बघायला मिळत आहे. त्यांना लहान मुले मोबाइलशिवाय जेवण करत नाही आणि गेम खेळल्याशिवाय झोपत नाही. अशात अनेक धक्कादायक घटनाही समोर येत असतात. हरयाणाच्या फरीदाबादमधूनही अशीच एक घटना समोर आली आहे. इथे एका दहावीत शिकत असलेल्या मुलीने आपल्या भावाची हत्या केली. कारण होतं मोबाइल. तिला असं वाटत होतं की, तिच्या भावाचे जास्त लाड केले जातात. मुलीने भावाला गेम खेळण्यासाठी मोबाइल मागितली आणि त्याने दिला नाही. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यूपीच्या औरैयामध्ये राहणारं दाम्पत्य फरीदाबादमध्ये राहतात. पती-पत्नी वेगवेगळ्या कंपनीत काम करतात. त्यांना एक 12 वर्षाचा मुलगा होता जो 5 व्या वर्गात शिकत होता आणि एक 15 वर्षांची मुलगी आहे जी 10व्या वर्गात शिकते. मंगळवारी जेव्हा पती-पत्नी दोघेही कामाहून घरी आले तेव्हा त्यांना मुलगा बेशुद्ध असलेला दिसला. त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं तर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

त्यानंतर पोलिसांची एक टीम हॉस्पिटलमध्ये पोहोचली आणि त्यांनी एका अज्ञाताविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर चौकशी सुरू केली. चौकशी दरम्यान मुलीवर हत्येचा संशय आला. जेव्हा पोलिसांनी सक्तीने तिची चौकशी केली तेव्हा तिने सांगितलं की, तिचे आई-वडील केवळ भावाचे लाड करत होते माझे नाही आणि तिला मोबाइल गेमही खेळायला मिळत नव्हता.

गेल्या मंगळवारी सुद्धा तेच झालं. मुलीने आपल्या भावाला फोन मागितली, पण त्याने दिला नाही. त्यानंतर तिने रागाच्या भरात लहान भावाचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. सध्या मुलीची चौकशी केली जात आहे. असं सांगण्यात येत आहे की, कायदेशीर गोष्टींचं पालन करून अल्पवयीन मुलीला जुवेनाइल जस्टिस बोर्ड समोर हजर केलं जाईल.

Web Title: Shocking! Minor sister killed brother for mobile game in Faridabad