धक्कादायक...अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 21:58 IST2018-08-23T21:57:31+5:302018-08-23T21:58:05+5:30
या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

धक्कादायक...अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून केली हत्या
भिवंडी - तालूक्यातील माणकोली गावात रहाणाऱ्या १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला जीवे ठार मारण्याची घटना आज सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात एकाच खळबळ माजली होती. मृत मुलगी घरात एकटीच होती.त्यावेळी तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून हत्या केली.तसेच तीला जीवे ठार मारण्याच्या हेतूने घरातील पाण्याच्या टफमध्ये बुडवून ठेवले आणि आरोपी पळून गेला.त्यानंतर घराबाहेर खेळण्यास गेलेला मयत मुलीचा भाऊ घरात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. मयत मुलीचे आईवडील व बहिण गोदामात काम करण्यास गेल्याने आरोपीने संधी साधली. त्यांना गावातील लोकांनी सांगितल्यानंतर घरी आले आणि या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.