धक्कादायक! सेक्स टॉयच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर विवाहितेचा बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 22:17 IST2019-11-10T22:12:09+5:302019-11-10T22:17:50+5:30
या महिलेने याआधीही काही मुलींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे.

धक्कादायक! सेक्स टॉयच्या मदतीने अल्पवयीन मुलीवर विवाहितेचा बलात्कार
हैदराबाद - एका विवाहित महिलेने एका अल्पवयीन मुलीवर सेक्स टॉयच्या वापर करून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली. नंतर आरोपी महिलेच्या पतीने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. या महिलेने याआधीही काही मुलींवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. आरोपी महिलेचे नाव सुमलता (३२) आहे.
सुमलताची तीन लग्न झाली होती. तिला पुरुषांसारखे कपडे घालायची आणि वागायची आवड होती. तसेच महिलांसोबत संबंध ठेवण्याची देखील तिची वासना होती. त्यासाठी ती अल्पवयीन मुलींना फोन करून त्यांच्याशी पुरुषाच्या आवाजात बोलायची. त्यावेळी ती तिचं नाव साई रमेश रेड्डी सांगात असे. घरात कुणीही नसताना ती त्या मुलींना घरी बोलावून त्यांच्यावर सेक्स टॉयचा वापर करून बलात्कार करायची अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली. या घटनेमुळे धक्का बसलेल्या मुलींना ती याबाबत कुणाला वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायची. मात्र, त्यातील एका मुलीने तिच्या पालकांना याबाबत सांगितल्यानंतर पोलिसांना तक्रार केली. नंतर पोलिसांनी सुमलताला अटक केली. सुमलताच्या घरून पोलिसांना सेक्स टॉय तसेच पुरुषांचे वेगळे कपडे देखील सापडले आहेत. सुमलताला पोलिसांनी अटक केल्याचा व तिने केलेल्या दुष्कृत्याची माहिती तिच्या नवऱ्याला समजल्यानंतर जबरदस्त धक्का बसला होता. त्यामुळे त्याने राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.