धक्कादायक! सहा हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2020 09:36 PM2020-02-20T21:36:55+5:302020-02-20T21:40:03+5:30

मेल पाठविलेला आयपी अ‍ॅड्रेसचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Shocking! Mail got bomb threaten in six hotels | धक्कादायक! सहा हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल

धक्कादायक! सहा हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल

Next
ठळक मुद्देद लीला, सी प्रिन्सेस, द पार्क, रमाडा इन, सहारा स्टार, सी अ‍ॅण्ड सॅण्ड या हॉटेलच्या ई-मेल आयडीवर अज्ञाताकडून एक संदेश पाठविण्यात आला. अज्ञात आयडीवर हे मेल पाठविण्यात आले असून त्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधला जात आहे.

मुंबई - पश्चिम उपनगरातील सहा उच्चभ्रू हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा मेल संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाला आल्याने सुरक्षा यंत्रणाची एकच खळबळ उडाली. बॉम्ब शोधक व नाशक पथक (बीडीडीएस) व स्थानिक पोलिसांनी संबंधित हॉटेलचा परिसर पिंजून काढल्यानंतर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. मेल पाठविलेला आयपी अ‍ॅड्रेसचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


रविवारी सकाळी पश्चिम उपनगरातील द लीला, सी प्रिन्सेस, द पार्क, रमाडा इन, सहारा स्टार, सी अ‍ॅण्ड सॅण्ड या हॉटेलच्या ई-मेल आयडीवर अज्ञाताकडून एक संदेश पाठविण्यात आला. हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून स्फोट घडविण्यात येणार आहे, असा मजकूर त्यामध्ये नमूद केला होता. त्यांनी तातडीने नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानंतर संबंधित सहाही हॉटेलमध्ये स्थानिक पोलीस आणि बीडीडीएसचे पथक दाखल झाले. हॉटेल व त्याचा परिसर धुंडाळून काढला. त्यामध्ये एकही संशयास्पद वस्तू आढळून न आल्याने पोलिसासह संबंधित हॉटेलच्या व्यवस्थापनाने समाधानाचा सुस्कारा सोडला. मेलद्वारे अफवा पसरविण्यात आल्याचे स्पष्ट झाले. अज्ञात आयडीवर हे मेल पाठविण्यात आले असून त्याचा आयपी अ‍ॅड्रेस शोधला जात आहे, असे पोलीस प्रवक्ते उपायुक्त प्रणय अशोक यांनी सांगितले.

Web Title: Shocking! Mail got bomb threaten in six hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.