शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

उकळते तूप ओतून पतीच्या महिलेची हत्या, पतीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीने केले कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 20:05 IST

Immoral Relationship : दोन महिन्यांनी प्रकार उघडकीस: वर्तकनगर पोलीस ठाण्यात आईची तक्रार

जितेंद्र कालेकरठाणे : पतीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून गीता यादव (३६) या महिलेने मनिषा पांडे (३०) हिच्या अंगावर उकळते तूप ओतून तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी लोकमान्यनगर भागात हा प्रकार घडला होता. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी मुंबईतील रुग्णालयात मनिषाचा मृत्यू झाल्याने तिची आई मीरा खिरदेकर (६०, रा. साठेनगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्ररकणी मंगळवारी खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमान्यनगर भागात मनिषा ही तिच्या तीन मुलांसोबत वास्तव्यास होती. तर ज्ञानेश्वरनगर भागात गीता वास्तव्याला आहे. पतीचे मनिषासोबत अनैतिक संबंध असल्याचा गीताला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वादही सुरू होते. मनिषा ही कामानिमित्ताने २३ जानेवारी २०२२ रोजी तिच्या माहेरी गेली होती. त्याचवेळी अचानक गीताने मनिषाला जेवण बनविण्यासाठी घरी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे मनिषा तिच्या लोकमान्यनगर येथील घरी पोहचली. घरात जेवण बनवित असताना गीताने उकळते तूप तिच्या अंगावर ओतले. या घटनेत तिचा चेहरा, छाती, मान, पोट आणि पाय होरपळल्याने ती गंभीर जखमी झाली.

स्थानिक रहिवाशांनी तिला तत्काळ कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ६ मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरुवातीला शीव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर मनिषाची आई मीरा यांनी या प्रकरणात गीताविरुद्ध संशय व्यक्त करून १४ मार्च रोजी तक्रार दिली. त्याचआधारे १५ मार्च रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात प्राथमिक चौकशीनंतर खुनाचा गुन्हा दाखल झाला. गीताला याप्रकरणी अद्याप अटक केली नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक महादू कुंभार हे याबाबतचा अधिक तपास करीत आहेत.पतीपासून वेगळे वास्तव्यालापतीशी वाद झाल्याने गीता ही तिच्या माहेरी वास्तव्याला होती. या घटनेच्या आठ दिवस आधीच लोकमान्यनगर येथे तिने स्वतंत्रपणे भाड्याने खोली घेतली होती. त्याच घरात हा प्रकार घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणेDeathमृत्यूArrestअटक