Crime News: धक्कादायक! नागरी वसाहतीतील लॉज चालकच वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे पुन्हा उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 22:10 IST2022-03-12T22:09:44+5:302022-03-12T22:10:04+5:30
Crime News: नागरी वसाहतीतील असणारे काही लॉज चालकच वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईने उघडकीस आले आहे .

Crime News: धक्कादायक! नागरी वसाहतीतील लॉज चालकच वेश्याव्यवसाय चालवत असल्याचे पुन्हा उघडकीस
मीरारोड - नागरी वसाहतीतील असणारे काही लॉज चालकच वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे पुन्हा एकदा पोलिसांच्या कारवाईने उघडकीस आले आहे . नवघर पोलीस ठाणे हद्दीत भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक भागातील श्री साई रिजन्सी लॉज मध्ये वेश्याववसाय चालवला जात असल्याने पोलिसांनी धड टाकून गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध भाईंदर पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्री साई रिजन्सी लॉजींग आणि बोर्डींग चे व्यवस्थापक आणि वेटर हे पुरुष गि-हाईकांना वेश्यागमनासाठी तरुणींचे फोटो व्हॉट्सएप वर पाठवून आवडी नुसार तरुणीची व लॉजच्या खोलीची रक्कम ठरवून वेश्याव्यवसाय चालवत आहेत . पाटील यांनी सत्यता पडताळुन घेण्यासाठी बोगस गि-हाईक व पंच यांना श्री साई रिजन्सी लॉजींग आणि बोर्डींग मध्ये पाठवले . लॉजचा व्यवस्थापक श्रीनिवास उर्फ श्रीकांत सुवर्णा याने बोगस गि-हाईकाकडुन वेश्यागमनाच्या मोबदला घेऊन तरुणी पुरवल्याचे स्पष्ट होताच पाटील यांच्यासह उमेश पाटील, विजय निलंगे, केशव शिंदे, वैष्णवी यंबर व गावडे यांच्या पथकाने छापा मारून पीडित तरुणीची सुटका केली व व्यवस्थापक सुवर्णा सह वेटर दिनेश कुमार प्रसाद, मनोजकुमार यादव, दिनेशकुमार भुईय्या व इश्वर बाजु महतो ह्यांना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलिसांनी नवघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर लॉजचे चालक - मालक असलेले शशींद्र शेटटी, देव, मनमत शेटटी, गणेश शेटटी, निशु शेटटी व नारायण शेटटी याना सुद्धा आरोपी केले असून नवघर पोलीस त्यांना अटक करणार कि आरोपी अटकपूर्व जामीन मिळवणार ह्या कडे नागरिकांचे लक्ष लागले आहे . गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. महेश पाटील, सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली हि कारवाई करण्यात आली . दरम्यान नागरी वस्तीत लॉज मधून चालणाऱ्या वेश्या व्यवसाय प्रकरणी पालिकेने अनधिकृत बांधकामे असलेल्या लॉज वर कारवाई करण्याची मागणी होत आहे .