धक्कादायक ! मोबाईल अॅपवरून ओळख करत महिलेला जबरदस्तीने दारू पाजून बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2020 15:39 IST2020-12-28T15:38:44+5:302020-12-28T15:39:30+5:30
हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद; आरोपीला अटक

धक्कादायक ! मोबाईल अॅपवरून ओळख करत महिलेला जबरदस्तीने दारू पाजून बलात्कार
पिंपरी : मोबाईलच्या टिंडर अॅपवरून ओळख करून महिलेला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर मारहाण करून तिच्यावर बलात्कार केला. शनिवारी (दि. २६) ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
अभिजित सीताराम वाघ (रा. तापकीर नगर चौक, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी महिला आणि आरोपीची टिंडर अॅप्लिकेशनवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला शनिवारी हिंजवडी येथील एफएमएल हॉटेलवर घेऊन जाऊन महिलेला जबरदस्तीने दारू पाजली. त्यानंतर आरोपीने फिर्यादी महिलेला त्याच्या घरी नेले. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्याला विरोध केला. त्यावरून आरोपीने महिलेला मारहाण करून जखमी केले. त्यानंतर महिलेवर बलात्कार केला.