महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:28 IST2026-02-18T09:12:02+5:302026-02-18T10:28:30+5:30

या घटनेनंतर भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले

Shocking incident in Maharashtra Pune Bhigwan! A girl was kidnapped by throwing chilli powder in the eyes of her mother and brother in daylight. | महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार! भरदिवसा आई अन् भावाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून तरुणीचे अपहरण

पुणे - जिल्ह्यातील भिगवण शहरात भरदिवसा एका ३१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर नागरिकांनी आंदोलन करत पुणे-सोलापूर महामार्ग मंगळवारी सायंकाळी काही काळ रोखून धरला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. संबंधित तरुणी तिच्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून घरी जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. अचानक हल्ला करत तरुणी, तिची आई आणि भावाच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यानंतर आई आणि भावाच्या हातावर लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. दोघे जखमी झाल्यानंतर आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने चारचाकी वाहनात ओढून बसवले आणि घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेनंतर जखमी कुटुंबीयांनी भिगवण पोलीस ठाणे तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी जहीर हारून शेख आणि आयान हारून शेख यांच्याविरुद्ध अपहरण व मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असून संभाव्य मार्गांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, या घटनेनंतर भिगवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संतप्त नागरिकांनी मंगळवारी सायंकाळी पुणे-सोलापूर महामार्गावर आंदोलन केले. आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे.

Web Title : महाराष्ट्र: परिवार पर मिर्च स्प्रे के बाद लड़की का अपहरण

Web Summary : महाराष्ट्र के भिगवन में, हमलावरों ने एक 31 वर्षीय महिला की माँ और भाई पर मिर्च स्प्रे करने के बाद उसका अपहरण कर लिया। घटना के बाद विरोध प्रदर्शन हुए, जिससे पुणे-सोलापुर राजमार्ग अवरुद्ध हो गया। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है, और संदिग्धों को पकड़ने के लिए नाकाबंदी कर दी गई है।

Web Title : Maharashtra: Girl Abducted After Pepper Spray Attack on Family

Web Summary : In Bhigwan, Maharashtra, a 31-year-old woman was abducted after attackers pepper-sprayed her mother and brother. The incident sparked protests, blocking the Pune-Solapur highway. Police have registered a case and are investigating, with roadblocks set up to catch the suspects.