बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार! पोटच्या मुलानेच केली धारदार शस्त्राने वडिलांची हत्या; कारण...

By पंकज पाटील | Updated: April 2, 2025 12:10 IST2025-04-02T12:07:08+5:302025-04-02T12:10:20+5:30

अनंत कराळे यांचा मुलगा गणेश कराळे याला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Shocking incident in Badlapur Son killed father with sharp weapon here is reason | बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार! पोटच्या मुलानेच केली धारदार शस्त्राने वडिलांची हत्या; कारण...

बदलापूरमध्ये धक्कादायक प्रकार! पोटच्या मुलानेच केली धारदार शस्त्राने वडिलांची हत्या; कारण...

पंकज पाटील, अंबरनाथ-बदलापूर: बदलापूरमध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतलंय. कौटुंबिक वादातून ही हत्या घडल्याचे सांगण्यात येत आहे.

बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला आहे. या गाळ्यात मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आले होते. त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले. याच वेळेस त्यांच्यात वाद झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Shocking incident in Badlapur Son killed father with sharp weapon here is reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.