शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विवाहितेच्या 'प्रायव्हसी'वर सासरच्यांची नजर, बेडरूमपासून किचनपर्यंत लावले कॅमेरे अन्...; संतापजनक प्रकार उघड, पोलीसही थक्क 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 14:33 IST

या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे....

उत्तर प्रदेशातील आग्रा येथून एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या खासगी आयुष्यावर पाळत ठेवण्यासाठी थेट बेडरूमपासून किचनपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे लावल्याचा प्रकार घडला आहे. महत्वाचे म्हणजे, हा संपूर्ण छळ हुंड्यावरून सुरू होता. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडितेने पोलिसांत धाव घेतली आहे. 

संतापजनक प्रकार उघड -संबंधित पीडिता आग्रा येथील ट्रान्स यमुना भागातील रहिवासी आहे. १२ मार्च २०१९ रोजी तिचे लग्न कपिल देव याच्याशी झाले होते. पीडितेच्या आरोपानुसार, लग्नात माहेरच्यांनी सुमारे १५ लाख रुपये खर्च करून सोन्या-चांदीचे दागिने, फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य, पाच लाख ५० हजारांची रोकड, बुलेट मोटारसायकल आदी सासरच्यांना दिले होते. मात्र, सासरच्या लोकांचे यावर समाधान झाले नाही. त्यांना आणखी हुंडा हवा होता. महत्वाचे म्हणजे, पीडितेचा दोन मुले झाल्यानंतरही छळ सुरूच होता. आता आरोपींकडून 'वॅगन-आर' कार आणि २ लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती.

बेडरूमपासून ते किचनपर्यंत CCTV कॅमेरे आणि मानसिक छळ -पीडितेने म्हटले आहे की, तिच्या दिराने घरातील बेडरूम आणि स्वयंपाकघरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. संबंधित विवारीतेच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले जाऊ लागले आणि टोमणे मारले जाऊ लागले. मानसिक त्रास देण्यासाठी हा संपूर्ण प्रकार होता. जेव्हा तिने या कॅमेऱ्यांचा विरोध केला, तेव्हा तिला मारहाण करून घरातून बाहेर काढण्यात आले.५ नोव्हेंबर २०२५ रोजी पीडितेला गंभीर मारहाण करण्यात आली आणि दुसऱ्या घरात लग्नची धमकी देण्यात आली. इतकेच नाही तर १२ डिसेंबर २०२५ रोजी मुलाची प्रकृती खराब असतानाही तिला घरातून हाकलून देण्यात आले. सध्या सर्व घरगुती साहित्य सासरच्यांनी स्वतःकडेच ठेवून घेतले आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Outrage! In-laws Spied on Woman with Cameras; Police Shocked.

Web Summary : In Agra, a woman was harassed for dowry. Her in-laws installed CCTV cameras in the bedroom and kitchen to monitor her every move, leading to severe mental and physical abuse. Police are investigating the case.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस