धक्कादायक! चोरीचा बनाव रचून पतीनेच केली पत्नीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 20:19 IST2019-07-05T20:18:32+5:302019-07-05T20:19:50+5:30

आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. 

Shocking husband murdered wife by made drama of robbery looted and he killed wife | धक्कादायक! चोरीचा बनाव रचून पतीनेच केली पत्नीची हत्या

धक्कादायक! चोरीचा बनाव रचून पतीनेच केली पत्नीची हत्या

ठळक मुद्देचोरीचा बनाव रचून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे विरार पोलिसांनी तपासात उघड केले विरार पोलिसांनी जबरी चोरी आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

नालासोपारा - विरार पूर्वेकडील इमारतीमध्ये बुधवारी ५० वर्षीय महिलेची निर्घृण हत्या करून घरामधील बेडरूमच्या कपाटामधून लाखो रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. चोरीचा बनाव रचून पतीनेच पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे विरारपोलिसांनी तपासात उघड केले असून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत. 

चंदनसार रोडवरील साहिल नगरमधील साहिल अपार्टमेंटमध्ये सदनिका नंबर ५ मध्ये राहणाऱ्या उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांची चोरट्याने घरात चोरी करून हत्या केल्याचा बनाव विरार पोलिसांनी उधळून लावला आहे. विरार पोलिसांनी जबरी चोरी आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. कॅटरिंगचा व्यवसाय करणारे आणि उमादेवी यांचे पती श्याम गुप्ता आणि त्यांच्या मुलीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. उमादेवी यांचे पती श्याम सोबत पटत नव्हते, चिडचिड करून दररोज भांडणे करायची, खर्चासाठी पैसेही देत नव्हती, कर्जाचा हप्ता भरण्यासाठी पैसे देत नव्हती, तुझ्यामुळे मला अपत्य होत नाही असे अपमानास्पद बोलून शिविगाळ करायची, मुलीला नेहमी मारहाण करायची या सर्व कारणांमुळे पती आणि पत्नी दोघेही नाराज होते. हत्येचा दिवशी पतीने घरातील असलेल्या लोखंडी फ्लॉवरपॉट आणि दगडी वरवंट्याने पत्नीच्या डोक्यात मारून व तिचे डोके भिंतीवर आपटून हत्या केली असल्याचे चौकशी अंती पतीने कबूल केले आहे. तसेच घरात चोरट्यांनी चोरी करून हत्या केल्याचा बनाव केल्याचेही कबूल केले आहे. घरातील चोरी झालेले रोख रक्कम आणि दागिनेही पोलिसांनी हस्तगत केले आहे. घटनास्थळी पालघर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास भेट दिली होती. 

नेमकी काय होती घटना?
विरार पूर्वेकडील चंदनसार रोडवरील कोपरी नाका येथील तांदूळ बाजार समोरील साहिल नगर मधील साहिल बिल्डिंगमधील सदनिका नंबर 5 मध्ये व्यापारी श्याम दीनदयाल गुप्ता (७०) हे पत्नी उमादेवी श्याम गुप्ता (५०) यांच्यासोबत राहतात. बुधवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास उमाराणी ह्या एकट्या घरात असताना चोरट्यांनी घरात प्रवेश करून धारदार हत्याराने डोक्यात व कपाळावर वार करून गंभीर दुखापत करून उमादेवी यांची निर्घृणपणे हत्या केल्यावर बेडरूमच्या कपटामधून ८० हजार रुपये रोख रक्कम, ९० हजारांच्या दोन सोन्याच्या चैनी, १५ हजारांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र, ६० हजारांचे २० ग्रॅम सोन्याचे गंठण, ३० हजारांचे १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुमके, १५ हजारांची ५ ग्रॅम सोन्याची बिंदीया, ३० हजारांच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, १० हजारांचे २५० ग्रॅम वजनाचे चांदीच्या पायातील पैंजण असा एकूण ३ लाख ३० हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला आहे.  

Web Title: Shocking husband murdered wife by made drama of robbery looted and he killed wife