धक्कादायक! पतीचा खून करून पत्नी प्रियकरासोबत फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2018 20:57 IST2018-12-31T20:53:34+5:302018-12-31T20:57:18+5:30
सफाई कामगार असलेल्या गोपी नाईक (30) यांची रविवारी पहाटे हत्या करून प्रिया नाईक ही प्रियकर महेश कराळेसोबत फरार झाली आहे. कासारवडवली पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

धक्कादायक! पतीचा खून करून पत्नी प्रियकरासोबत फरार
ठाणे - अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा काटा काढून महिला प्रियकरासोबत पळाली आहे. सफाई कामगार असलेल्या गोपी नाईक (30) यांची रविवारी पहाटे हत्या करून प्रिया नाईक ही प्रियकर महेश कराळेसोबत फरार झाली आहे. कासारवडवली पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.
गायमुख येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या श्रमसाफल्य या इमारतीत गोपी, पत्नी प्रिया व आठ वर्षीय मुलीसह राहात होता. प्रिया व महेश कराळे याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. त्यावरून नाईक पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडत असत. या वादातून प्रियाने महेशच्या मदतीने गोपीचा गळा दाबून डोक्यावर आघात केला. त्यानंतर जखमी गोपीला घेऊन दोघेही सिव्हिल रुग्णालयात गेले. तेथे गोपीचा अपघात झाल्याचा बनाव त्यांनी करत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच गोपीचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले असता त्याआधीच आरोपी जोडगोळीने रुग्णालयातून पळ काढला.