धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना
By Appasaheb.patil | Updated: May 31, 2023 16:31 IST2023-05-31T16:31:37+5:302023-05-31T16:31:56+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृध्द पतीने आपल्या पत्नीची सत्तुरने गळा कापून हत्या ...

धक्कादायक; पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील घटना
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेत वृध्द पतीने आपल्या पत्नीची सत्तुरने गळा कापून हत्या केली असून हत्येनंतर स्वत:ही गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमागचं कारण अद्याप समजू शकले नाही. मंदुप पोलिस अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, लाडलेसाब हुसेनी नदाफ (वय ६५) असे पत्नीची हत्या करणार्या पतीचे नाव असून त्यांच्या मृत पत्नीचं नाव नगुमा लाडलेसाब नदाफ (वय ६३) असे आहे. ही घटना उघडकीस येताच मंद्रुप गावात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मंद्रुप पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रविंद्र मांजरेंनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.