Shocking! Human sacrifice of abdominal pores; Out of superstition, the mother struck the wound with an ax | धक्कादायक! मुलगा ठरला अंधश्रद्धेचा बळी, देवीला प्रसन्न करण्यासाठी आईने गळा कापला!

धक्कादायक! मुलगा ठरला अंधश्रद्धेचा बळी, देवीला प्रसन्न करण्यासाठी आईने गळा कापला!

ठळक मुद्देकायदेशीर कारवाईनंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात असल्याचे सोनी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेत वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली.

मध्य प्रदेशच्या पन्ना जिल्ह्यात अंधश्रद्धेने देवीने प्रसन्न करण्यासाठी एका महिलेने आपल्या २४ वर्षाच्या मुलाची गळ्यावर कुऱ्हाडीने घाव घालून बळी दिला. ही घटना गुरुवारी पहाटे जिल्ह्यातील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील कोहनी गावात घडली.

या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पन्ना कोतवाली पोलिस स्टेशनचे प्रभारी अरुण सोनी यांनी सांगितले की, आज पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांना अशी माहिती मिळाली की, कोहानी गावात सुनियाबाई लोधी (नडजे ५० वर्षे) हिने मुलगा द्वारका लोधी (वय २४) याचा गळ्यावर कुऱ्हाडीने वार केला आहे. ते पुढे म्हणाले, सुनियाबाईंवर गेल्या दोन वर्षांपासून थोडासा दैवीय प्रभाव (देवी अंगात येणं) जाणवत होता आणि अशी घटनाही आज रात्री घडली. तिच्या अंगात देवी यायची आणि म्हणायची की, मी बळी घेणार. त्यावर तिने मुलगा रात्रीत झोपेत असताना त्याची हत्या केली.


कायदेशीर कारवाईनंतर मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले जात असल्याचे सोनी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आरोपी महिलेलाही अटक करण्यात आली असून तिची चौकशी सुरु आहे. या घटनेत वापरलेली कुऱ्हाड पोलिसांनी ताब्यात घेतली. चौकशीत ती म्हणाली, घटनेच्या वेळी सुनियाबाई, तिचा नवरा आणि मुलगा तिच्या घरी होते. तिचा नवरा आणि मुलगा झोपले होते. रात्री सुनियाबाईंनी कुऱ्हाड घेऊन मुलाला कापले. तिनेही आपल्या मुलाला कापून तिच्या नवऱ्याला सांगितले होते की पाहा, मी माझे काम केले आहे. त्याग केला आहे. मुलाला ठार मारले आहे, जाऊन पाहा, अशी माहिती अमर उजालाने दिली आहे.  

Web Title: Shocking! Human sacrifice of abdominal pores; Out of superstition, the mother struck the wound with an ax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.