धक्कादायक ! इच्छेविरुद्ध लग्न केल्याने घाटकोपरमध्ये गर्भवती मुलीची बापाने केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:06 IST2019-07-15T17:46:31+5:302019-07-15T18:06:40+5:30
मृत महिलेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे.

धक्कादायक ! इच्छेविरुद्ध लग्न केल्याने घाटकोपरमध्ये गर्भवती मुलीची बापाने केली हत्या
मुंबई - काल सकाळी ७.१० वाजताच्या सुमारास घाटकोपर येथील मधुबन टोयोटा शोरूसमोरील नारायण नगर रिक्षा सस्टॅण्डमागील फूटपाथवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला एक मृतदेह पोलिसांना आढळून आला होता. याप्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गांभीर्य ओळखून पोलिसांना वेगाने तपास केला आणि मृत महिलेच्या वडिलांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत महिलेचे नाव मीनाक्षी ब्रिजेश चौरसिया (२०) असून आरोपी वडिलांचे नाव राम कुमार चौरसिया (५५) असं आहे.
घाटकोपरमध्ये काल दिवसाढवळ्या हत्या झाल्याने खळबळ माजली होती. वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याच्या रागाने वडिलांनी मुलीची हत्या केली असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. मृत महिला चार महिन्याची गर्भवती होती. मिनाक्षीच्या हत्याप्रकरणाचा उलगडा करत असताना पोलिसांनी मिनाक्षीचे वडील, भाऊ आणि पती, इतर नातेवाईकांकडे कैशल्यपूर्ण तपास केला. तसेच गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि तांत्रिक दृष्ट्या केलेल्या तपासत मीनाक्षीची हत्या वडील राम कुमार यांनीच केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर घाटकोपर पोलिसांनी राम कुमारला अटक केली. पोलिसांच्या तपासात राम कुमारची मुलगी मीनाक्षी हिने आपल्या मर्जीने वडिलांच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने ही हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबई : घाटकोपरमध्ये गर्भवती मुलीची वड़िलांनीच केली हत्या, घाटकोपर हत्याप्रकरणाचा उलगडा, वडील अटकेत https://t.co/thzM8ylhGc
— Lokmat (@MiLOKMAT) July 15, 2019