Shocking! Gang rape of HIV positive widow on express train | धक्कादायक! एक्सप्रेस ट्रेनमध्ये HIV ग्रस्त महिलेवर सामूहिक बलात्कार

धक्कादायक! एक्सप्रेस ट्रेनमध्ये HIV ग्रस्त महिलेवर सामूहिक बलात्कार

ठळक मुद्देपोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडल्याचे कळताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांपैकी एकाला पकडण्यात जवानांना यश आले. बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.या महिलेला HIVची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले.

सासाराम (रोहतास) -  बिहारमधील कैमूर जिल्यातील भभुआ रोड स्टेशनवर आलेल्या एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका HIV ग्रस्त विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.२२ वर्षीय HIV ग्रस्त महिलेवर एक्सप्रेस गाडीच्या डब्यात दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना सोमवारी रात्री पटना-भभुआ इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

पटना-भभुआ  इंटरसिटी एक्सप्रेस सोमवारी रात्री ११.५० वाजताच्यासुमारास भभुआ रोड स्थानकात पोहोचल्यानंतर डब्यांची पाहणी करत असताना आरपीएफ आणि जीआरपीच्या जवानांना हा लैंगिक अत्याचार सुरू असल्याचे पहिले. या महिलेला अडवून धरलेल्या या दोन आरोपींना पोलिसांनी डब्यातच ताब्यात घेतले. दोन आरोपींपैकी एक आरोपी या महिलेवर बलात्कार करत होता. तसेच दुसरा आरोपी या लैंगिक अत्याचाराचे शूटिंग करत होता, अशी खळबळजनक माहिती जीआरपीच्या जवानांनी दिली. पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ पकडल्याचे कळताच दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांपैकी एकाला पकडण्यात जवानांना यश आले. काही वेळाने दुसऱ्या आरोपीच्या मुसक्याही आवळण्यात आल्या. अत्याचार झाले तेव्हा ही महिला डब्यात एकटीच होती, असे अधिकारी म्हणाला. या एक्सप्रेसचे भभुआ रोड हे शेवटचे स्थानक आहे. ही गाडी पटण्याहून संध्याकाळी ५.४५ वाजता सुटते.

ही पीडित महिला वैद्यकीय तपासणीकरून पटण्याहून घरी परतत होती. त्यावेळी हे दोन आरोपी कुद्रा रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये चढले. हे स्थानक भभुआ स्थानकाआधी येते. बीरेंद्र प्रकाश सिंग (२६) आणि दीपक सिंग (२८) अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनीही पोलिसांपुढे आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. कोर्टाने दोघांनाही १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ठोठावली.पीडित महिलेचा जबाब नोंदवल्यानंतर तिला वैद्यकीय तपासणीसाठी भभुआ सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पीडित महिलेला तिच्या नवऱ्याने सोडून दिले होते. काही काळानंतर तिच्या पतीचे HIV या आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेला HIVची लागण झाल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. त्यानंतर या महिलेवर उपचार सुरू करण्यात आले, अशी माहिती तपास अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Shocking! Gang rape of HIV positive widow on express train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.