धक्कादायक! अज्ञात तरुणांकडून ३४ वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 19:58 IST2019-09-25T19:54:54+5:302019-09-25T19:58:01+5:30
लैंगिक अत्याचारानंतर सुमारे अर्धा तास पीडित तरुणास अज्ञात आरोपी मारहाण करत होते.

धक्कादायक! अज्ञात तरुणांकडून ३४ वर्षीय तरुणावर सामूहिक बलात्कार
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - वाशीतील सागर विहार परिसरातून तरुणाचे अपहरण करून सामूहिक बलात्कार केला आहे. ही हादरून टाकणारी घटना आज उघडकीस आली आहे. लैंगिक अत्याचारानंतर सुमारे अर्धा तास पीडित तरुणास अज्ञात आरोपी मारहाण करत होते. वेळीच उपचार मिळाल्याने पीडित तरुणाचे प्राण वाचले आहेत. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाशी येथील सागर विहार परिसरात हा प्रकार घडला आहे. तुर्भे परिसरात राहणारा 34 वर्षीय तरुण त्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी आला होता. यावेळी पाच तरुण आले. ते सर्वजण नशेमध्ये होते. त्यांनी पीडित तरुणावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून पळ काढला. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. नवी मुंबईत अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. हे कृत्य करणारे तरुण देखील पूर्णत: नशेत होते. त्यामुळे या घटनेवरून महिला मुलींसह एकट्या तरुणांच्या देखील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नवी मुंबई : अज्ञात तरुणांकडून ३४ वर्षीय मुलावर सामूहिक बलात्कारhttps://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) September 25, 2019