शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये चार युवकांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 18:17 IST

जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात हे मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या.

ठळक मुद्देरिक्षा उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जेलरोड परिसरात घडली.तिसऱ्या घटनेत मुंबई - आग्रा महामार्गावर विरूद्ध दिशेने भरधाव दुचाकीने समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीला धडक दिल्याने  झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आडगाव शिवारात घडली.

नाशिक : शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या दुचाकी आणि रिक्षाच्या अपघातांमध्ये चौघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये दोघे युवकांचा समावेश आहे. जेलरोड, चेहेडी, आडगाव, जुने नाशिक या भागात हे मोटार अपघाताच्या दुर्घटना घडल्या.

रिक्षा उलटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना जेलरोड परिसरात घडली.प्रशांत सुरेश बर्वे (३८, रा. पंचक सरस्वतीनगर, जेलरोड) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. शनिवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्याची रिक्षा अचानकपणे उलटल्याने बर्वे गंभीर जखमी झाला होता. यानंतर बिटको रूग्णालयात प्राथमिक उपचार करून तो घरी गेला होता. मात्र पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यास  बिटको रूग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांनी घोषीत केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या घटनेत नाशिक - पुणे महामार्गावर सायकलवरून पडून गंभीर जखमी झालेल्या एका इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि.१६)  सकाळी चेहडी परिसरात घडली. प्रविण नामदेव बेलेकर (५३, रा. चेहडी) असे या घटनेत मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बेलेकर हे सायकलवरून जात असताना चेहडीजवळ सायकलवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. तिसऱ्या घटनेत मुंबई - आग्रा महामार्गावर विरूद्ध दिशेने भरधाव दुचाकीने समोरून येणार्‍या दुसर्‍या दुचाकीला धडक दिल्याने  झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आडगाव शिवारात घडली.

सैयद अली सैयद (पुर्ण पत्ता नाही) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. तर संजय नारायण माळोदे (३५, रा. दत्त मंदिर, आडगाव) हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना ९ ऑगस्टला दुपारी घडली. यातील मृत्यू झालेला सैयद हा त्याची दुचाकीवरून (एमएच १५, एल. १३४५) वरून  महामार्गावरून विरूद्ध दिशेने भरधाव दुचाकी चालवत होता. समोरून माळोदे त्यांच्या दुचाकीने (एम.एच१५, बी.एल. ५६०६) येत असताना सैयद याचा ताबा सुटल्याने त्याची दुचाकी   माळोदे यांच्या दुचाकीवर जाऊन आदळली.

या धडकेत दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान सय्यद याचा अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौथ्या घटनेत भरधाव दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना जुनेनाशिकमधील मोठा राजवाडा परिसरात घडली. विकी संतोष तेजाळे (२४, रा. मोठा राजवाडा) असे आपघतात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.  विकी हा दुचाकीने भरधाव जात असताना दुचाकी घसरून अपघात झाला. यावेळी तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार लागला होता. त्यास उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूNashikनाशिकauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिस