Shocking! Firing on businessman; Unknown accussed absconded | धक्कादायक! व्यावसायिकावर गोळीबार; अज्ञात हल्लेखोर फरार

धक्कादायक! व्यावसायिकावर गोळीबार; अज्ञात हल्लेखोर फरार

ठळक मुद्देवालधुनी पूल ओलांडल्यानंतर एका दुचाकीवरून दोन तरुण त्याच्याजवळ आले मुदस्सर यांच्या हाताला पायाला दोन गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कल्याण - एका व्यावसायिकावर गोळीबार करून दोन अज्ञात हल्लेखोर फरार झाल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील बैल बाजार परिसरात राहणारे व्यावसायिक मुदस्सर मजीद (३९) काल रात्री साडे दहाच्या सुमारास एक रिक्षात बसून उल्हासनगरच्या दिशेने जात होते. वालधुनी पूल ओलांडल्यानंतर एका दुचाकीवरून दोन तरुण त्याच्याजवळ आले व त्यामधील एकाने मुदस्सरवर गोळीबार करून पसार झाले. मुदस्सर यांच्या हाताला पायाला दोन गोळ्या लागल्या असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुदस्सर याचा त्याच्या नातेवाईकांसोबत वाद सुरु आहे. तसेच, अन्य कोणत्या कारणाने हल्ला झाला आहे का याबाबत तपास सुरू असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

Web Title: Shocking! Firing on businessman; Unknown accussed absconded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.