ठळक मुद्देमालाडमधील एका खासगी रुग्णालयात एका महिलेवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास या रुग्णालयाचा २१ वर्षीय सुरक्षारक्षक या महिलेच्या खोलीत शिरला आणि त्याने तिचा हात पकडला.
मालाड येथील एका खाजगी रुग्णालयात महिलेशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनीविनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तसेच छेड काढणाऱ्या सुरक्षारक्षकाला अटक केली आहे.
मालाडमधील एका खासगी रुग्णालयात एका महिलेवर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. बुधवारी मध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास या रुग्णालयाचा २१ वर्षीय सुरक्षारक्षक या महिलेच्या खोलीत शिरला आणि त्याने तिचा हात पकडला. नंतर घाबरून महिलेने मदतीसाठी जवळच असलेली बेल वाजवली आणि आरडाओरड केला. तिचा आवाज ऐकून रुग्णालयातील अन्य कर्मचारी धावत तिच्या खोलीत आले. त्यांनी सुरक्षारक्षकाला पकडले आणि कुरार पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Shocking! Female patient molested at hospital, security guard arrested
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.