धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याकडूनच लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 14:02 IST2020-12-25T14:00:32+5:302020-12-25T14:02:09+5:30

तळेगाव दाभाडे येथे २४ एप्रिल ते ९ ऑक्टोबर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. 

Shocking! father sexually abused a minor girl | धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याकडूनच लैंगिक अत्याचार

धक्कादायक! पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याकडूनच लैंगिक अत्याचार

तळेगाव दाभाडे : पोटच्या मुलीवर जन्मदात्या पित्याने अत्याचार केल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर वडिलांनीच लैंगिक आत्याचार केला. तळेगाव दाभाडे येथे २४ एप्रिल ते ९ ऑक्टोबर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. 

तळेगाव दाभाडे येथील ३५ वर्षीय नराधम पित्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर हा गुन्हा तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या आईवडिलांसह तळेगाव दाभाडे येथे राहते. ती घरात झोपली असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक आत्याचार केला. तसेच हे कोणाला सांगितले तर तुझ्या आईला ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुलगी तिच्या आईसोबत कर्जत येथे मामाच्या गावाला गेली. त्यावेळी तिने या प्रकाराबाबत सांगितले. त्यानुसार तिच्या आईने पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर तपास करीत आहेत

Web Title: Shocking! father sexually abused a minor girl