Shocking! Father raped on daughter; father arrested by police | धक्कादायक! पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार; पोलिसांनी केली अटक  

धक्कादायक! पोटच्या मुलीवर बापाने केला बलात्कार; पोलिसांनी केली अटक  

ठळक मुद्देपूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी बापाला तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत

नालासोपारा - ७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळींज पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणे तुळींज पोलिसांनी आरोपी बापाला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास सुरु आहे. 

पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे नात्यानेच नात्याला काळिमा फासला आहे. पीडित मुलीच्या आईने मंगळवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपारा पूर्वेकडील परिसरात राहणाऱ्या 7 वर्षीय अल्पवयीन मुलीवर आरोपी बाप अवध उर्फ अजय उपाध्याय (26) याने नोव्हेंबर 2019 मध्ये आरोपी बाप कामावर जाण्याचा बहाणा करून आई कामावर गेल्यावर परत घरी येऊन लहान भावंडांना घराबाहेर खेळायला पाठवून नंतर तिच्यावर अत्याचार केल्याचे कुकर्म केले आहे. गुन्हा दाखल झाल्यावर आरोपी बापाला तुळींज पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

Web Title: Shocking! Father raped on daughter; father arrested by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.