शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Crime: पत्नीचे परपुरुषाशी संबंध, अनेकदा समजावूनही ऐकेना; वैतागून पतीनं मुलीसह उचललं टोकाचं पाऊल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:32 IST

Uttar Pradesh Unnao Crime News: उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली.

उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली. गंगाघाट कोतवाली परिसरातील सहजानी क्रॉसिंगजवळ एका ५० वर्षीय व्यक्तीने आपल्या १४ वर्षीय मुलीसह रेल्वेसमोर उडी मारून जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून,आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पत्नीला जबाबदार धरण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, २३ फेब्रुवारीच्या रात्री ८:४५ वाजता रेल्वे ट्रॅकच्या कडेला दोन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मृतांची ओळख विकास गुप्ता (वय, ५०) आणि त्यांची मुलगी वेदिका (वय, १४) अशी पटली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर विकास यांची पांढऱ्या रंगाची कार आढळून आली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता, एका मोबाईल फोनच्या मागे लपवलेली सुसाईड नोट सापडली. या चिठ्ठीत विकास यांनी आपल्या मृत्यूसाठी पत्नीला जबाबदार धरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या पत्नीच्या निधनानंतर विकास यांनी डॉली नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्या संसारात वादाची ठिणगी पडली होती. मृताचा भाऊ शिवम उमर याने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, विकासच्या पत्नीचे दुसऱ्या एका व्यक्तीशी प्रेमसंबंध होते आणि ती त्याच्यासोबत दुबईला पळून जाण्याच्या तयारीत होती. याच वादातून विकासने मुलीसह आत्महत्या केली. 

घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी डॉलीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. आम्ही सुसाईड नोट आणि कुटुंबाने केलेले आरोप या दोन्ही बाजू पडताळून पाहत आहोत. शवविच्छेदन अहवाल आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष चौकशी केली जाईल, अशी माहिती उन्नाव येथील एका पोलीस अधिकाऱ्याने दिली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Husband, daughter commit suicide due to wife's affair: Unnao tragedy.

Web Summary : Upset over his wife's affair and planned elopement, a man in Unnao, Uttar Pradesh, tragically killed himself and his 14-year-old daughter. A suicide note blamed the wife. Police are investigating, filing charges against her and others.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशunnao-pcउन्हाओ