धक्कादायक; वादावादीत त्यानं बायकोचं शिर कापलं, ते घेऊनच पोलीस स्टेशन गाठलं!

By महेश गलांडे | Updated: October 9, 2020 12:27 IST2020-10-09T12:15:06+5:302020-10-09T12:27:15+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्नार यादव असे आरोपीचे नाव असून पती-पत्नीमधील किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे.

Shocking; During the argument, he beheaded his wife and took her to the police station in up | धक्कादायक; वादावादीत त्यानं बायकोचं शिर कापलं, ते घेऊनच पोलीस स्टेशन गाठलं!

धक्कादायक; वादावादीत त्यानं बायकोचं शिर कापलं, ते घेऊनच पोलीस स्टेशन गाठलं!

बांदा - उत्तर प्रदेशमधील महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच, एका पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे पत्नीचे शिर धडापासून वेगळे करुन ते शिर घेऊन तो पोलीस ठाण्यात पोहोचला. हे पाहून पोलीसही चक्रावले असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. उत्तर प्रदेशच्या बादा जिल्ह्यात आज सकाळी ही धक्कादायक घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिन्नार यादव असे आरोपीचे नाव असून पती-पत्नीमधील किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले आहे. बांदा जिल्ह्यातील नेता नगर याठिकाणी सकाळी 7.30 वाजता पत्नी विमला (35) सोबत पतीचे भांडण झाले होते.  या किरकोळ वादात, रागाच्या भरात पती चिन्नार याने धारदार शस्त्राने पत्नीचे शिरच धडापासून वेगळे केले. त्यानंतर, पत्नीचे शिर घेऊन जवळील बाबेरु पोलीस ठाण्यात जाऊन स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती, पोलीस अधीक्षक महेंद्र प्रतापसिंह चौहान यांनी दिली. 

आपल्या पत्नीचे शिर घेऊन चालतानाचा या पतीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी चिन्नार यादव यास अटक केली असून त्याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. तसेच, मृत महिलेचे शरीर फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. 
 

Web Title: Shocking; During the argument, he beheaded his wife and took her to the police station in up