धक्कादायक! मृत वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितले म्हणून मुलाने केली आईची हत्या, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2020 15:12 IST2020-12-30T15:10:57+5:302020-12-30T15:12:08+5:30
Crime News : आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे.

धक्कादायक! मृत वडिलांनी स्वप्नात येऊन सांगितले म्हणून मुलाने केली आईची हत्या, म्हणाला...
बडोदा - आई आणि मुलाच्या नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. गुजरातमधील बडोदा येथे मुलाने अजब कारण देऊन आईची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या मुलाने आईचा मृतदेह पेट्रोल टाकून जाळूल्याचेही उघड झाले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घरी आलेल्या बहिणीने आईच्या हत्येचे कारण विचारल्यावर या विक्षिप्त मुलाने दिलेले उत्तर धक्कादायक आहे. मृत्यू पावलेल्या वडिलांनी आपल्याला स्वप्नात येऊन आईला वर पाठवण्यास सांगितले, म्हणून मी तिला ठार केले, असे त्याने सांगितले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिव्येश असे या मुलाचे नाव असून, त्याने आपल्या ५० वर्षीय आईच्या छातीत आणि पोटात काच घुसवून तिची हत्या केली. त्यानंतर या आईचा मृतदेह घरामागच्या आवारात नेवून त्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिला. मृतदेह पेटल्यानंतर त्याच्या शेजारी उभे राहून त्याने 'ओम नम: शिवाय'चा जप सुरू केला. यादरम्यान शेजाऱ्यांनी हा प्रकार पाहून पोलिसांना खबर दिली.
याबाबत माहिती देताना आरोपीच्या बहिणीने सांगितले की, जेव्हा मी घरी आले तेव्हा मी माझ्या भावाला विचारले की, तू आईला का मारले? तेव्हा त्याने मला वडिलांनी स्वप्नात येऊन आईला आपल्याकडे पाठवण्यास सांगितल्याची कहाणी सांगितली.
या प्रकरणातील आरोपी असलेला २७ वर्षीय दिव्येश बारिया हा पेशाने ड्रायव्हर आहे. सोमवारी रात्री दिव्येशने आईची हत्या केली होती. तसेच हत्येनंतर तिचा मृतदेह दहन केला होता. दरम्यान, दिव्येश याला पोलिसांनी अटक केली आहे.