धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून वडाळयामध्ये सुनेकडून सासूची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2019 18:03 IST2019-06-20T18:01:24+5:302019-06-20T18:03:56+5:30

या प्रकरणी वडाळा पोलिसांनी सुरेखा गिरे (३५) या सुनेला अटक केली आहे.

Shocking daughter in law killed to mother in law in wadala | धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून वडाळयामध्ये सुनेकडून सासूची हत्या

धक्कादायक! क्षुल्लक कारणावरून वडाळयामध्ये सुनेकडून सासूची हत्या

ठळक मुद्देसाखराबाई गिरे असं या मृत महिलेचं नाव आहे.  वादात राग अनावर झालेल्या सुरेखाने साखराबाईला मारहाण केली. 

मुंबई - वडाळा परिसरात क्षुल्लक कारणावरून सुनेने आपल्या सासूची हत्या केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. साखराबाई गिरे असं या मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी सुरेखा गिरे (३५) या सुनेला अटक केली आहे.

वडाळाच्या कोरबा मिठागर परिसरातील तांबे नगरमध्ये साखराबाई या त्यांचा मुलगा आणि सुनेसोबत राहत होत्या. मागील अनेक दिवसांपासून दोघींमध्ये क्षुल्लक कारणांवरून वाद होत असत. बुधवारी सून आपला व्यवस्थित सांभाळ करत नसल्यामुळे नावावर असलेली खोली साखराबाई यांनी विकण्याची इच्छा व्यक्त केली. यावरून दोघींमध्ये मोठा वाद झाला. वादात राग अनावर झालेल्या सुरेखाने साखराबाईला मारहाण केली. या मारहाणीत साखराबाई गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या. त्यांना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वडाळा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वडाळा पोलिसांनी आरोपी सुनेला अटक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक गंगाधर सोनावणे यांनी दिली.

 

Web Title: Shocking daughter in law killed to mother in law in wadala