धक्कादायक! लग्न ठरलेल्या जोडप्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2019 19:36 IST2019-10-06T19:33:36+5:302019-10-06T19:36:59+5:30
घणसोलीतली घटना; मुलाच्या घरी दोघे असताना घेतला गळफास

धक्कादायक! लग्न ठरलेल्या जोडप्याची आत्महत्या
नवी मुंबई - लग्न ठरलेल्या जोडप्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी घणसोली येथे घडली. मुलाच्या घरी दोघेच असताना हा प्रकार घडला.
दत्त वरे (26) आणि साक्षी गोळे (19) असे आत्महत्या केलेल्या जोडप्याचे नाव आहे. त्यांची सोशल मीडियावर एकमेकांची ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांचे लग्न ठरले होते. त्यानुसार 24 ऑक्टोबर ला त्यांचा साखरपुडा ठरला होता. तत्पूर्वीच आज दुपारी मुलाच्या घरी दोघांनी गळफास लावून आत्महत्या केली. दुपारी मुलाचा भाऊ घरी आला असता दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे दरवाजा तोडला असता हा प्रकार उघड झाला. मात्र त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसल्याचे रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.