धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 13:24 IST2026-04-07T13:23:39+5:302026-04-07T13:24:26+5:30

स्वतःच्या लहान भावाच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Shocking! Brother's wife tortured; Mother testified against son, court gives harsh verdict | धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय

AI Generated Image

राजस्थानातील जोधपूर येथे कुटुंबातील नात्यांना काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. स्वतःच्या लहान भावाच्या पत्नीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षांच्या कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरोपीच्या आईनेच न्यायाच्या बाजूने उभे राहत मुलाविरोधात साक्ष दिली.

नात्यांची मर्यादा ओलांडणारा गुन्हा

ही घटना २०२१ मधील असून आरोपीने आपल्या लहान भावाच्या पत्नीवर शेतात एकटी असताना बलात्कार केला. पीडित महिला भीतीपोटी बराच काळ गप्प राहिली. मात्र, आरोपीचे वाढते धाडस पुढे आणखी गंभीर प्रकाराला कारणीभूत ठरले.

दुसऱ्या वहिनीवरही अत्याचाराचा प्रयत्न

पहिल्या घटनेनंतर सुमारे चार महिन्यांनी आरोपीने दुसऱ्या भावाच्या पत्नीवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. रात्री झोपेत असताना तो तिच्याजवळ गेला. मात्र पीडितेने आरडाओरडा केल्याने आरोपीची आई जागी झाली आणि तिने प्रतिकार केला. त्यामुळे आरोपी तेथून पसार झाला.

आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष

या प्रकरणात आरोपीची आई ही सर्वात महत्त्वाची साक्षीदार ठरली. तिने न्यायालयात स्पष्ट सांगितले की तिचा मुलगा दारूच्या आहारी गेलेला असून, तो गुन्हेगार प्रवृत्तीचा झाला आहे. मुलावर माया असली तरी तिने सत्याचा मार्ग निवडला. न्यायालयाने तिच्या धैर्याचे कौतुक केले.

विशेष न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले की, “जो व्यक्ती आपल्या भावाच्या पत्नीवर वाईट नजर ठेवतो, तो समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे.” यावेळी सुनावणी करताना आरोपीला १० वर्षांची शिक्षा आणि ८५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच पीडित महिलांना लवकरात लवकर नुकसानभरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

उशिरा का होईना, न्याय मिळालाच!

घटना घडल्यानंतर कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि तपासानंतर पुरावे सादर करण्यात आले. अखेर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत कठोर शिक्षा सुनावली.

Web Title : भाई की पत्नी पर अत्याचार; माँ ने बेटे के खिलाफ गवाही दी; कठोर फैसला।

Web Summary : राजस्थान में भाई की पत्नी पर अत्याचार करने पर व्यक्ति को 10 साल की जेल। माँ ने बेटे के खिलाफ गवाही दी। उसने दूसरी भाभी पर भी हमले का प्रयास किया। अदालत ने उसे खतरनाक बताया।

Web Title : Brother's wife assaulted; Mother testifies against son; Harsh court verdict.

Web Summary : Rajasthan man jailed for 10 years for assaulting his brother's wife. The mother testified against her son, a key witness. He also attempted assault on another sister-in-law. Court called him dangerous.