धक्कादायक! प्रियकराने गळा दाबून केली प्रेयसीची हत्या; दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा होता संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 11:31 IST2021-09-05T22:05:41+5:302023-07-12T11:31:45+5:30

Murder Case : तुळिंज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.

Shocking! Boyfriend kills girlfriend by strangling her; Suspected of having an affair with another boy | धक्कादायक! प्रियकराने गळा दाबून केली प्रेयसीची हत्या; दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा होता संशय

धक्कादायक! प्रियकराने गळा दाबून केली प्रेयसीची हत्या; दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध असल्याचा होता संशय

ठळक मुद्देसाडी कंपाऊंडच्या जय अंबे वेल्फेयर सोसायटीत १ सप्टेंबरपासून ज्योती गौतम (२३) आणि अविनाश कुमार (२८) हे दोघे भाड्याने लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते.

नालासोपारा : तुळिंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत आचोळे रोडवरील साडी कंपाऊंडमध्ये रविवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास एका प्रियकराने प्रेमिकेची गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. तुळिंज पोलिसांनी आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले असून महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तुळिंज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साडी कंपाऊंडच्या जय अंबे वेल्फेयर सोसायटीत १ सप्टेंबरपासून ज्योती गौतम (२३) आणि अविनाश कुमार (२८) हे दोघे भाड्याने लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहत होते. तिचे दुसऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून आरोपी अविनाशने तिची रविवारी संध्याकाळच्या सुमारास गळा आवळून हत्या केली आहे. तुळिंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी बातमीला दुजोरा दिला आहे.

Web Title: Shocking! Boyfriend kills girlfriend by strangling her; Suspected of having an affair with another boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.