शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

धक्कादायक! प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 7:33 PM

याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसंगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवाशी असलेला अमित अशोक मिंडे हा युवक राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) याठिकाणी एका खाजगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन या पदावर नोकरी करीत होता.बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने गेल्या असता त्यांना मृतदेह आढळून आला.

तळेगाव दिघे - प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने प्रियकराने विषारी औषध घेत आत्महत्या केली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आली.संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रहिवाशी असलेला अमित अशोक मिंडे हा युवक राजगुरूनगर (ता. खेड, जि. पुणे) याठिकाणी एका खाजगी रुग्णालयात एमआरआय टेक्निशियन या पदावर नोकरी करीत होता. याच रुग्णालयात बीएचएमएसचे शिक्षण असलेली एक डॉक्टर तरुणी नोकरी करीत होती. एकाच रुग्णालयात नोकरीस असल्याने दोघांचे प्रेमसबंध जुळले होते. दरम्यान मंगळवारी (दि. ५) डॉक्टर तरुणी तिच्या घरी आली होती. तिच्या समवेत अमित मिंडे हा देखील आला होता. मात्र तरुणीने अमितला लग्नास नकार दिला. प्रेमभंग झालेल्या अमित मिंडे याने मोबाईलवरुन कुटुंबियांशी संपर्क साधत घडला प्रकार त्यांना सांगितला. त्यानंतर कौठेकमळेश्वर शिवारात अमितने डाळींब बागेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या करीत जीवनयात्रा संपविली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास काही महिला सरपण काढण्याच्या निमित्ताने गेल्या असता त्यांना मृतदेह आढळून आला. डाळींब बागेनजीक दुचाकी आढळून आली. या घटनेची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना कळविली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक अश्विनी टिळे, लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. आत्महत्येपूर्वी अमित मिंडे याने फोनकरून कुटुंबियांना या सर्व प्रकाराची माहिती दिली होती, असे पोलीस नाईक बाबा खेडकर यांनी सांगितले. याप्रकरणी मयताचा भाऊ सुधीर अशोक मिंडे याने पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लक्ष्मण औटी, पोलीस नाईक बाबा खेडकर अधिक तपास करीत आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPuneपुणेPoliceपोलिस