धक्कादायक... बेपत्ता दाम्पत्याचा शोध घेत असताना सापडला पत्नीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 18:15 IST2018-10-26T18:15:12+5:302018-10-26T18:15:45+5:30
दरम्यान पोलिसांना पत्नीचा मृतदेह सापडला असून पतीचा शोध सुरु आहे

धक्कादायक... बेपत्ता दाम्पत्याचा शोध घेत असताना सापडला पत्नीचा मृतदेह
महाबळेश्वर - लिंगमळा धबधब्याजवळ आज सकाळपासून एक दाम्पत्य बेपत्ता झाले होते. याबाबत पोलिसात माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरु केले. दरम्यान पोलिसांना पत्नीचा मृतदेह सापडला असून पतीचा शोध सुरु आहे. महाबळेश्वर येथील लिंगमळा धबधबा हे पर्यटनस्थळ असून तेथे हे दाम्पत्य फिरायला आले होते.