शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

धक्कादायक! ओला कॅब चालकाचा मृतदेह सापडला खंडाळ्याच्या जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 20:35 IST

Crime News : विरार पोलीस ठाण्यात १९ जूनपासून हरवल्याची तक्रार होती दाखल

ठळक मुद्देखंडाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

नालासोपारा : सहकार नगरमध्ये राहणारे ४५ वर्षीय ओला कॅबचालक १९ जूनला बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत खंडाळा परिसरातील जंगलात रविवारी सापडला आहे. खंडाळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नेमकी ही हत्या आहे की अपघात याचा पोलीस तपास करत आहे.१९ जूनला राहुलकुमार झा (२२) या मुलाने विरार पोलीस ठाण्यात वडील संतोष झा (४५) यांचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रार दाखल करून शोध सुरू केला. त्याच दिवशी संध्याकाळी कोल्हापूरहून ओला कार जप्त करण्यात आली. पोलिसांना गाडीच्या मागील बाजूस रक्ताचे डाग सापडल्यानंतर दोन पथके तयार करण्यात आली होती. पोलिसांच्या दोन पथकांनी खंडाळा क्षेत्र पुलासमोर घनदाट जंगलात संतोष झा यांचा शोध सुरू केला. त्याच परिसरातील एका पेट्रोल पंपावर त्यांच्या कार्डचा वापर करून ट्रांझेक्शन झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिसांनी मोबाइल माहितीद्वारे अपहरण करणाऱ्या कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांना ताब्यात घेतल्याचेही कळते. पोलीस पथकाला खंडाळा परिसरातील घनदाट जंगलात एक कुजलेला मृतदेह सापडल्यामुळे संतोष झा यांना ओळखण्यात पोलिसांना अडचण निर्माण झाली होती.

पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविला. मात्र मृतदेहाचे शरीर खूपच खराब झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुलगा आणि वडिलांचे डीएनए जुळल्यानंतर हा मृतदेह त्यांचाच असल्याची पोलिसांची खात्री पटली. दीर्घकाळ मृतदेह ठेवल्याने कोविडसारख्या आजाराची शक्यता असल्याने तेथील समशानभूमीत मुलाने पोलिसांसमोर वडिलांच्या मृतदेहाला अग्नी दिली.कांदिवली येथून अपहरणपोलीस सूत्रांनुसार, मुंबईच्या कांदिवली येथील दोन सख्ख्या भावांनी १७ जूनला ओला कॅब कर्नाटक येथील गावाला जाण्यासाठी बुक केली होती. तेथूनच त्यांचे अपहरण करण्यात आले होते. कार तेथून पनवेल, खोपोली अशी फिरवण्यात आल्यानंतर खंडाळा येथे नेण्यात आले. आरोपींनी त्यांची हत्या करून मृतदेह घनदाट जंगलात टाकून पळून गेल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला कांदिवली येथून ताब्यात घेतल्याचे कळते.कोट 

खंडाळ्याच्या जंगलामध्ये संतोष झा यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. कोणालाही ताब्यात घेतले नसून चौकशी सुरू आहे. त्यांच्या मृतदेहावर तेथील समशानभूमीत अंत्यसंस्कार केले आहेत. तेथील पोलीस ठाण्यातून कागदपत्रे आल्यावर पुढील कारवाई नक्कीच होणार. - सुरेश वराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे.

 

टॅग्स :Deathमृत्यूVasai Virarवसई विरारthaneठाणेSatara areaसातारा परिसरPoliceपोलिसMissingबेपत्ता होणंVirarविरार