Shocking! The body of a missing girl from Ghatkopar was found in the nullah | धक्कादायक! घाटकोपर येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला नाल्यात

धक्कादायक! घाटकोपर येथील बेपत्ता मुलीचा मृतदेह सापडला नाल्यात

ठळक मुद्देदिपाली बुकने (२१) ही मुलगी २५ सप्टेंबर पासून बेपत्ता होती. सोमवारी या मुलीचा मृतदेह रमाबाई आंबेडकर नगर येथील नाल्यामध्ये पडलेला आढळून आला.

मुंबई : घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर मध्ये राहणारी दिपाली बुकने (२१) ही मुलगी २५ सप्टेंबर पासून बेपत्ता होती. सोमवारी या मुलीचा मृतदेह रमाबाई आंबेडकर नगर येथील नाल्यामध्ये पडलेला आढळून आला. 

२५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दिपाली घरात कोणालाही न सांगता घराबाहेर निघून गेली. यानंतर नातेवाईक व पोलीस दीपालीचा शोध घेत होते. सोमवारी २ वाजता ती बेशुद्ध अवस्थेत नाल्यात आढळल्याचे समजतात अग्निशामक दलाच्या मदतीने तिला बाहेर काढले. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शवविच्छेदनात तिच्या शरीरावर कुठेही जखमा आढळल्या नसल्या तरी देखील मृत्यूचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.

Web Title: Shocking! The body of a missing girl from Ghatkopar was found in the nullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.