शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थ्यावर वार : आठवीतील मुलांचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 14:30 IST

शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टोळी युध्दातून घडली घटना..

ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या चार जणांच्या टोळीने केले जखमीपुन्हा एकदा पालकांनो जागे व्हा! असे म्हणण्याची आली वेळ

पुणे: सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी परिसरातील एका नामांकित शाळेमधील इयत्ता आठवीच्याविद्यार्थ्याने सातवीच्या विद्यार्थ्याच्या हातावर धारदार कटरने वार केले.त्यामुळे त्याच्या हाताला 11 टाके पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.या घटनेमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टोळी युध्दातून घडली घटना.दिल्लीतील रॉयल इंटरनॅशनल स्कूल या शाळेत इयत्ता दुसरीतील मुलाचा बस चालकाने निर्घृण खून केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. त्यामुळे खासगी व नामांकित शाळांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. ज्ञानदानाचे काम करणारे शैक्षणिक संकुलही विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित नाही का? शाळा प्रशासनाच्या भरवशावर मुलांना शाळेत पाठवणे उचित आहे का? अशा अनेक बाजूंनी चर्चा झाली होती. आता पुण्यातही एका आठवीच्या मुलाने सातवीच्या मुलाच्या हातावर स्वच्छतागृहात धारदार कटरने वार केल्याची घटना नुकतीच घडली.त्यामुळे पुन्हा एकदा पालकांनो जागे व्हा! असे म्हणण्याची वेळ आली आहे.शाळेमध्ये प्रवेश देताना मुलांची वागणूक तपासली जात नाही.एखादा मुलगा त्याच शहरातील काही किलो मीटर परिसरातील एखादी नामांकित शाळा सोडून आपल्या शाळेत प्रवेश का घेतो? याबाबत शाळा प्रशासन जराही गंभीर नाही. केवळ डोनेशन मिळते म्हणून कोणत्याही मुलाला शाळेत प्रवेश द्यायचा,असाच विचार शाळांकडून होताना दिसत आहे.पुण्यात सातवीतील मुलावर वार करणा-या आठवीतील या  विद्यार्थ्याला पूर्वी एका शाळेने नाव कमी (रस्टिकेट)करून काढून टाकले होते.त्यानंतर त्याला सिंहगड रस्त्यावरील शाळेने प्रवेश दिला होता.त्याच मुलाने हे कृत्य केल्याचे पालकांकडून सांगितले जात आहे.सातवीतील मुलगा सुरूवातीपासून सिंहगड रस्त्याच्या शाळेत शिक्षण घेत होता.तर नव्याने या शाळेत दाखल झालेल्या आठवीतील मुलाचा आणि त्याचा लहान-सहान कारणांवरून वाद होत होता.या दोन्ही विद्यार्थ्यांनी स्वत:ची टोळी तयार केली होती. त्यामुळे आठवीतील मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने सातवीतील मुलाला स्वच्छतागृहात बोलवून त्याच्या हातावर वार केले. त्यात तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे शाळेतील इतर मुलांच्या मनावर विपरित परिणाम झाला आहे.शाळा प्रशासनाने व संस्थाचालकाने हे प्रकरण बाहेर येऊ नये, याची काळजी घेतली आहे.परंतु,पालकांकडून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीSchoolशाळाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस