धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये तलवारीने चौघांवर प्राणघातक हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 23:12 IST2020-05-06T23:10:09+5:302020-05-06T23:12:01+5:30
शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री 15 ते 20 जण हातात तलवारी, रॉड घेऊन घुसले आणि जो समोर दिसेल त्याला मारहाण करत होते.

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये तलवारीने चौघांवर प्राणघातक हल्ला
ठाणे - अंबरनाथ शहरात सोमवारी रात्री सशस्त्र टोळक्याने धुडगूस घालून चौघांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. शास्त्रीनगर भागात सोमवारी रात्री 15 ते 20 जण हातात तलवारी, रॉड घेऊन घुसले आणि जो समोर दिसेल त्याला मारहाण करत होते.
यात चारजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. हा सगळा प्रकार परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या घटनेनंतर अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत सहा जणांना अटक केली आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात इतका कडक बंदोबस्त असून चौकाचौकात नाकाबंदी असतना हे हल्लेखोर कुठून आले आणि त्यांनी हा हल्ला का केला असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहत आहेत .
सुरक्षा दलाला मोठं यश, हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर, मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याला केले ठार
Coronavirus : चिंताजनक! जीटी हॉस्पिटलमधून कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला