Shocking! Again Accident in bhiwandi; Woman dies in front of husband, daughter | धक्कादायक! भिवंडीत पुन्हा अपघात; पती, मुलीसमोर महिलेचा मृत्यू 
धक्कादायक! भिवंडीत पुन्हा अपघात; पती, मुलीसमोर महिलेचा मृत्यू 

ठळक मुद्देया अपघातामध्ये महिलेचा पती आणि लहान मुलगी बचावली आहे. भाईंदर पाडा येथून ही महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह दुचाकीवरुन जात असताना दुचाकीचा अपघात झाला

ठाणे - भिवंडी येथे खड्ड्यांमुळे कालच पेशाने डॉक्टर असलेल्या 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच भिवंडीतअपघातात आणखी एका महिलेला जीव गमावल्याची माहिती समोर येत आहे. भरधाव कंटेनर मागून आल्याने घोडबंदरवर दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला जीव गमवावा लागला आहे. गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास घोडबंदर रोडवरील भाईंदर पाडा येथे हा अपघात झाला आहे. 

भाईंदर पाडा येथून ही महिला आपल्या पती आणि लहान मुलीसह दुचाकीवरुन जात असताना दुचाकीचा अपघात झाला आणि यात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री महिला दुचाकीवरून जात असताना अचानक मागून भरधाव वेगाने एक कंटेनर आला. दरम्यान, दुचाकीवर बसलेल्या महिलेचा तोल जाऊन ती खाली पडली आणि तिझ्या अंगावर तो मागून भरधाव वेगाने येणारा कंटेनर गेला. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये महिलेचा पती आणि लहान मुलगी बचावली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Web Title: Shocking! Again Accident in bhiwandi; Woman dies in front of husband, daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.