धक्कादायक ! मद्यपी मुलाचा खून करून शव २ दिवस घरातच ठेवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 13:15 IST2020-05-27T13:14:09+5:302020-05-27T13:15:36+5:30

एवढ्या टोकाचे पाऊल वडिलांनी का उचलले, या मागचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.

Shocking! After killing the drunken boy, the body was kept at home for 2 days | धक्कादायक ! मद्यपी मुलाचा खून करून शव २ दिवस घरातच ठेवले

धक्कादायक ! मद्यपी मुलाचा खून करून शव २ दिवस घरातच ठेवले

ठळक मुद्देमयताची आई सुमनबाई चव्हाण यांनी वसमत पोलीस ठाण्यात माहिती दिली़

वसमत (जि. हिंगोली) : मुलगा दारू पिऊन घरी आल्याने पित्यासोबत वाद झाला़ यात त्यांनी मुलाचा दोरीने गळा आवळून खून केल्यानंतर दोन दिवस शव घरात ठेवले़ मंगळवारी प्रकरण समोर आल्यानंतर मुलाच्या आईच्या तक्रारीवरून निवृत्त शिक्षक पित्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

वसमत येथील माऊली हाऊसिंग सोसायटी भागात राहणारे सेवानिवृत्त शिक्षक उत्तम मिठ्ठू चव्हाण (वय ६६ वर्षे) व त्यांचा मुलगा उमेश उत्तम चव्हाण (३०) या दोघांत २४ मे रोजी रात्री १० च्या सुमारास वाद झाला़ वडिलांनी रागाच्या भरात मुलाचा दोरीने गळा अवळून खून केला़ खुनाची घटना घडल्यानंतर शव घरातच राहिले़ मग दुर्गंधी पसरू लागली़ अखेर मंगळवारी सायंकाळी मयताची आई सुमनबाई चव्हाण यांनी वसमत पोलीस ठाण्यात माहिती दिली

पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी घटनास्थळी पाहणी केली़ मयताची आई सुमनबाई यांच्या फिर्यादीवरून उत्तम मिठ्ठू चव्हाण यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला़ पोलीस उपविभागीय अधिकारी सतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली़ आरोपी पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़. एवढ्या टोकाचे पाऊल वडिलांनी का उचलले, या मागचे नेमके कारण पोलीस शोधत आहेत.

Web Title: Shocking! After killing the drunken boy, the body was kept at home for 2 days