धक्कादायक! अभिनेत्रीचा मृतदेह आढळला किचनमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2019 21:03 IST2019-12-25T21:01:26+5:302019-12-25T21:03:23+5:30
आता अभिनेत्रीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधलं जात आहे.

धक्कादायक! अभिनेत्रीचा मृतदेह आढळला किचनमध्ये
तिरुवनंतपुरम - टीव्ही सिरीयल्समधील सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रिटी शेफ जग्गी जॉन हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरात किचनमध्ये सापडला. जग्गी ही केरळची राजधानी तिरुवनंतपुरममध्ये राहत होती. सोमवारी संध्याकाळी तिचा मृतदेह तिच्या घरात आढळून आला. तिचा घरी मित्र आला त्यावेळी ती मृतावस्थेत आढळून आली. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
सोमवारी जग्गीला भेटण्यासाठी तिचा एक मित्र घरी आला होता. त्यावेळी तो किचनमध्ये तिला भेटण्यासाठी गेला. मात्र, जेव्हा तो किचनमध्ये पोहचला. त्यावेळी जग्गी खाली पडलेली त्याला दिसून आली. तिच्याजवळ गेला त्यावेळी जग्गी मृतावस्थेत आढळून आली. नंतर मित्राने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. राहत्या घरात अचानक अशा पद्धतीने एका प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सध्या पोलीस याचा तपास करत असून आता अभिनेत्रीच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधलं जात आहे.
पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. जग्गीच्या मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या खुणाही नाहीत. त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला या निष्कर्षापर्यंत पोचणं अवघड आहे शवविच्छेदनानंतरच जग्गीच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असे पोलीस म्हणाले. जग्गीच्या अकस्मात निधनाने तिच्या आईला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण ज्यावेळी जग्गीचा मृत्यू झाला. त्यावेळी ती देखील घरातच होती.