धक्कादायक! लोकलमधून पडून तरुणीचा अपघाती मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:17 IST2019-12-16T16:14:09+5:302019-12-16T16:17:22+5:30

भाऊ वारस म्हणून आला असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.

 Shocking! Accidental death of young woman falling from local train | धक्कादायक! लोकलमधून पडून तरुणीचा अपघाती मृत्यू 

धक्कादायक! लोकलमधून पडून तरुणीचा अपघाती मृत्यू 

ठळक मुद्दे चार्मी ही नवोदित मॉडेल आणि अभिनेत्री होती.एका खासगी कंपनीत नोकरीनिमित्त ती नेहमीप्रमाणे डोंबिवली येथून जलद लोकलने प्रवास करत असताना हा अपघात घडला.

डोंबिवली - लोकलमधील गर्दीमुळे पडून चार्मी पासड (२२) या तरुणीही आज सकाळी अपघाती मृत्यू झाला आहे. मृत तरुणी डोंबिवलीतील देसलेपाडायेथे राहत होती. ही दुर्दैवी घटना डोंबिवली कोपर स्थानकादरम्यान घडली आहे. चार्मी ही नवोदित मॉडेल आणि अभिनेत्री होती. एका खासगी कंपनीत नोकरीनिमित्त ती नेहमीप्रमाणे डोंबिवली येथून जलद लोकलने प्रवास करत असताना हा अपघात घडला. याबाबत तरुणीच्या कुटूंबियांना कळवण्यात आले असून भाऊ वारस म्हणून आला असल्याची माहिती डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी दिली.


लोकलच्या गर्दीमुळे हा प्रघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. चार्मी पासड असं मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास चाकरमान्यांची ऑफिसला जाण्यासाठी लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. आज सकाळी डोंबिवली रेल्वे स्थानकाहून ८. ५३ वाजताची सीएसएमटीकडे जाणारी जलद लोकल चार्मीने प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वरून पकडली होती. गर्दी असल्याने तिला लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर उभं राहण्यासाठी कशीबशी जागा मिळाली. तरी देखील ती आत शिरण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, कोपर येथे रेल्वेच्या आतून गर्दीचा लोंढा आला आणि दरवाज्यावर उभ्या असलेल्या चार्मीचा तोल गेला. ती डोंबिवली कोपरदरम्यान धावत्या लोकलमधून पडली. यामुळे तिच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.

Web Title:  Shocking! Accidental death of young woman falling from local train